कासोदा : शेतात कापूस वेचनी सुरु असतांना शेतकऱ्याच्या घरात भरदिवसा दीड लाखांची चोरी करीत चोरट्यांनी पुन्हा एकदा कासोदा पोलीसांना आवाहन दिले असून याबाबत कासोदा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील साई पार्क मधील रहिवासी भागवत त्र्यंबक चौधरी हे दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी पत्नीसह शेतात कापूस वेचणीसाठी ते घराला कुलूप लावून गेले असता त्यांच्या पश्चात सकाळी साडेआठ ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामधील कपाटाचे लाॅक तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने तसेच बॅगमधील ७ हजारांची रोख रक्कम व कापसाचे २ बोथे असे एकूण १ लाख ५८ हजार ७७० रुपयांची चोरट्यांनी घरफोडी करीत पसार झाले.
भागवत चौधरी हे संध्याकाळी शेतातून घरी आले असता त्यांना घराचा दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळून आले असता घरातील कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त दिसले. भागवत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि निता कायते यांच्या मार्गदर्शनात स.फौ. सहदेव घुले, इम्रान पठाण, समाधान तोंडे, प्रवीण हटकर हे करीत आहेत. भरदिवसा दीड लाखांची धाडसी चोरी करीत कासोदा पोलीसांना चोरट्यांकडून खुले आवाहनच दिले असल्याची गावात चर्चा असून पोलीसांच्या कामगिरी बद्दल देखील शंका उपस्थित होत आहे.
भरदिवसा चोरी पोलिसांकडून तपास शून्य
भरदिवसा घरफोडी झाल्याची ही दुसरी घटना असून या आगोदर महिन्यापूर्वीच किराणा दुकानदाराकडे घरफोडीत २ लाख ४० हजारांची चोरी झाली होती तर या आगोदर १६ गाव योजनेतील फिल्टर प्लांट वरुन लाखो रुपयांची पाण्याच्या मोटरी इलेक्ट्रीक साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारत पोबारा केला. इतर चोरीचा तपास लावण्यास कासोदा पोलीस अपयशी ठरल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे या घटनांमधून उमटत असून या चोरीमुळे कासोदा गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .
भरदिवसा होत असलेल्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून कासोदा पोलीस प्रशासना कडून तपास शून्य आहे.परिसरात अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत.ते बंद करून गावात गस्त वाढवावी भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






