पुणे – महिलांवरील होणारे अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका माजी सरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संतोष नाझिरकर (४०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नझिरकर हे पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाचे माजी सरपंच आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसातच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. बुधवारी बाहेर जेवायला जाऊ अस सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
पीडित मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






