सोलापूर : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच मुलाच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आलेल्या लातूर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने रविवारी हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहलता प्रभू जाधव ( वय ४५, रा. लातूर) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या पूर्वी त्यांनी नातेवाईकाला फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.
स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबर लग्न रोजी होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. शनिवारी रात्री उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमीत्त लातूरला गेले. दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूर मधील नातेवाईकाला फोन करत जोरजोराने रडत आपण ‘आत्महत्या करणार’ असे सांगू लागल्या. यामुळे नातेवाईकांनी समजून सांगत या घटनेची माहिती सोलापुरातील नातेवाईकांना दिली. जेमतेम दहा ते पंधरा मिनिटांनी सोलापुरातील नातेवाईक हॉटेलवर गेल्यानंतर हॉटेलचा दरवाजा बंद आढळला. यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना लगेच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले.
त्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, रात्री विजापूर नाक्याचे विलास घुगे, विशाल जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. घटनेचा अधिक तपास विलास घुगे करत आहेत. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा झाली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






