प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून पी.डी.पाटील यांना “जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार ” जाहीर !….

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव – धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना यावर्षी प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे.


पी.डी.पाटील यांची शैक्षणिक – सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रोटॉन शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काकडे सर, जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव सर, मिलींद निकम सर व संपूर्ण टीम कडून हा पुरस्कार जाहीर झालाअसून या पुरस्काराचे वितरण ४ डिसेंबर, २०२२ रविवार रोजी जिल्हाधिकार्यालय जळगांव येथील अल्पबचत भुवन येथे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव साहेब व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.


ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, धरणगाव प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, कार्याध्यक्ष सतीश शिंदे व मित्र परिवाराकडून पाटील यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. पी डी पाटील यांना यापूर्वी राज्यस्तरीय, खान्देश स्तरीय, जिल्हास्तरीय ७ पुरस्कार मिळालेल्या असून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी मला हा पुरस्कार जाहीर झाला की माझी कार्याची पावती आहे. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पी डी पाटील यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार