सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक जण बाईकवर स्टंटबाजी करताना दिसतात. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी मोबाईलवर रिल्स बनवून तसेच रस्त्यात येजा करताना भन्नाट डान्स करायचा अनेकांचा छंदच बनला आहे. पण एका वृद्धाने बाईकवरून सवारी करताना स्टंटबाजी नाही तर महिलेला चक्क चुंबन घेतलं आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
एका वृद्धाने बाईकवरून जात असताना मागच्या सीटवर बसलेल्या महिलेचं भर रस्त्यात चुंबन घेतलं. बाईक वेगानं चालवत असतानाच वृद्धाने हे भयंकर कृत्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केला जात आहे. त्या महिलेसोबत एक मुलगाही बाईकवर बसलेला असतो. आपल्यासोबत कुटुंबातील सदस्य असतानाही वृद्धाने महिलेला चुंबन घेण्याचा अजब प्रकार केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
व्हिडीओ पाहून युजर्सला बसला धक्का
वृद्धाने महिलेला चुंबन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जिन्दगी गुलजार है या नावाच्या युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘बुजुर्गों का इमरान हाशमी’. या व्हिडीओला 57 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






