औरंगाबाद,(प्रतिनिधी) :- एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाने १७ वर्षीय मुलीला ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाहीस, आज मी मरेन आणि तुलाही मारीन, अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडगाव कोल्हाटी, वाळूज येथे राहणाऱ्या शिवा साळुंके असं या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज येथे कुटुंबासह राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिसरातील एका महाविद्यालयात १२वी चे शिक्षण घेत आहे. दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराजवळ असताना रात्री ९ वाजच्या सुमारास तिच्या ओळखीचा शिवा साळुंके हा तरुण तिच्याजवळ येतं तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये ये म्हणत, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला नकार देताच, शिवाने तिचा हात पकडून तू माझी नाहीस तर कोणाची नाही असे म्हणत तिचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड सुरू केल्याने मुलीच्या घरातील लोक बाहेर आले आणि मुलीच्या घरच्यांना पाहून शिवाने तेथून पळ काढला.
मात्र तरि देखील दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगी ही महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असतांना पाठीमागून आलेल्या शिवाने तिला रस्त्यात अडवून आज मी मरणार असून, तुलाही मारणार असल्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला.हे ऐकून मुलगी खूप घाबरून गेली…मुलीने आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिवा साळुंके याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






