कासोदा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे सत्र सुरूच आडगाव येथे चोरांचा सोन्यावर डल्ला. दिवसा झालेली घटना

Spread the love

कासोदा ता.एरंडोल: पाठोपाठ येथून जवळ असलेल्या आडगाव येथे ही इतर वस्तू अथवा काही जड वस्तू चोरण्यापेक्षा आडगाव येथील युवराज सुकदेव महाजन यांचेकडे चोरट्यांनी सकाळी ८:००ते संध्याकाळी ६:००वाजे दरम्यान दिनांक २७ नोव्हेबर रोजी शेतकरी शेतात जातात याचा फायदा घेत एकुण ५६ हजाराचे सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची फिर्याद आडगाव येथील युवराज महाजन यांनी कासोदा पोलीसांत फिर्याद दाखल केली त्यात ४५हजार रुपये किंमतीचे ९ ग्रम वजनाची सोन पोत, ४ हजार रुपये किंमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोनबाया ,२०००रुपये किंमतीचे अर्धा ग्रॅम वजनाचे पतक्या, २०००रु.किमतीचे अर्धा ग्रॅम वजनाचे ओमपान, ३००० रु.किमतीचे चांदीचे लहान बाळाचे कडे.एवढ्या५६०००रुपये किंमतीच्या वस्तू चोरट्यांनी चोरुन पोबारा केला.
अश्याच आशयाच्या चोर्या कासोदा येथील किराणा दुकानदार यांच्या घरात दिवसा ढवळ्या २ लाख ४० हजार रुपयाची चोरी झाली होती.त्या नंतर परवा कासोदा येथील एका शेतकरीकडे १लाख ५८हजाराची नुकतीच परवाच चोरी झाली. तसेच १६ गाव पाणीपुरवठा योजनेत तर लाखो रुपयांचा इले.साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला होता त्याचा अद्याप तपास नाही. त्याचप्रमाणे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी रामनगर भागात रात्रीच्यावेळेस एका घरात चोरी करण्याचा चोरांचा प्रयत्न केला घराचे कुलूप तोडून घरातील कपाटे तोडून सामान अस्ताव्यस्त फेकून दिला परंतु त्या ठिकाणी चोरांना काहीच रोकड रकम अथवा सोने चांदीच्या वस्तू आढळून आले नाही म्हणून घरमालकाने गुन्हा नोंद केला नाहीअशी चर्चा या परीसरात सुरू आहे.
चोर्याचे प्रमाण वाढल्यामुळे कासोदा पोलीसांना हे मोठे आव्हान आहे.व अश्या चोर्यामुळे कासोदा आणि परिसरातील जनतेमध्ये फार मोठ्याप्रमाणात भिंतीचे वातावरण पसरले आहे.आता कासोदा पोलीस ही जनतेतील भिती कशी घालवतात याकडे कासोदा आणि परीसरातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
सदर गुन्ह्याच्या तपास स पो नि निता कायटे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सहदेव घुले व हेडकॉन्स्टेबल युवराज कोळी हे करीत आहे.

टीम झुंजार