धरणगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य ,पुणे ; जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय जळगांव ; व इंदिरा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने शासकीय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगांव येथे आयोजीत करण्यात आले आहे .
सदर स्पर्धेच्या उदघाटन महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुराबराव पाटील यांच्या हस्तेकरण्यात आले, तर प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा अधिकारी एम.के.पाटील होते.
यावेळी व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य सौ. सुरेखा पाटील , आदर्श विद्यालयाचे संचालक अश्विन पाटील , डी.एन.पतील , हेमंत माळी .तसेच प्रत्येक तालुक्यातील क्रीडा शिक्षक व तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. मुलांच्या एकूण 11 संघांनी आपले सहभाग नोंदविला तर मुलींच्या 8 संघांनी आपले सहभाग नोंदविला होता.
आज झालेल्या 17 वर्षा आतील मुलींच्या सामन्यात प्रताप विद्यालय चोपडा,व पी. आर.हायस्कूल ,धरणगाव यांच्यात झालेल्या अंतीम सामन्यात प्रताप विद्यालय ,चोपडा हा संघ विजयी ठरला तसेच 17 वर्षा आतील मुलांच्या संघात इंदिरा गांधी विद्यालय धरणगांव व बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल ,पाचोरा यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात इंदिरा गांधी विद्यालय धरणगांवच्या संघाने विजय संपादन केले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा.रवींद्र कंखरे (अध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन स्कुटिनी कमिटि) , श्री सुमेर वाघरे (म.पो.) क्षितीज सोनवणे,फिलिप गावीत, गौरव भागवत, ईश्वर चौधरी, अनिकेत सोनवणे,वैभव भोलाने, ललित डोके, रुपेश चौधरी, राज पाटिल तसेच कर्मचारी अमोल भाऊ, योगेश पाटील ,अनिल तावडे यांनी कार्य केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाजन
यांनी केले तर आभार श्री आकाश बिवाल यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






