भारत सर्वांचा असून हा देश संविधानावर चालतो — लक्ष्मणराव पाटील
सत्रासेन (चोपडा) — येथील धनाजी नाना प्राथमिक व डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सत्रासेन तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे भारतीय संविधान दिवस निमित्ताने जनसाहस फाऊंडेशन डी.एम.आर.सी.सेंटर अमळनेर जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव येथील गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी भारतीय संविधान सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व संविधान जनजागृती, मुलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य या विषयावर सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल देखील माहिती दिली. भारत देशात कायद्याचे राज्य असून हा देश संविधानावर चालतो, असं मत लक्ष्मणराव पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विविध प्रकारचे शासकीय योजना ओळखपत्र, शासकीय योजना कार्ड, योजना यांच्याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी माहिती देण्यात आली, यावेळी संस्थेचे समन्वयक निलेश नाना शिंदे, राहुल चौधरी, कु.माधुरी ढिवरे आदी मान्यवरांनी विविध महापुरुषांच्या जीवन परिचय करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले, शाळेच्या माध्यमिक मुख्याध्यापिका;चोपडा माध्यमिक पतपेढी उपाध्यक्षा तथा सत्रासेन गावच्या लोकनियुक्त सरपंच वंदना सरदार पावरा, प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन, उच्च माध्यमिक शिक्षक भालचंद्र पवार, योगेश पाटील सर, मनोज पाटील सर, नरेंद्र देसलेसर गजानन पाटील सर, झुलाल करंकाळ सर, जेष्ठ माध्यमिक शिक्षक कैलास महाजन सर, संजय शिरसाळे सर, महेशकुमार शिंदे, अधिक भादले सर, प्राथमिक शिक्षक उदय वानखेडे सर, विकास कोळी सर, सुशिलकुमार चव्हाण सर, अजय पावरा सर, मनोज साळुंखे सर, पवन पावरा सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु – भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रविंद्र रायसिंग भादले, उपाध्यक्ष धनंजय रायसिंग भादले व आदिवासी विकास विभाग कर्मचारी पतसंस्था संचालिका दिपमाला रविंद्र भादले यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक पवन पावरा सर यांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन हे संजय शिरसाळे यांनी केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






