रोहिदास स्मृती दिनानिमित्त पिंप्री येथे अभिवादन सभा संपन्न .

Spread the love

महापुरुषांची विचारधारा आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्जा देते – सतिष शिंदे – ( युवा प्रचारक शाहू , फुले , आंबेडकर विचारधारा )

धरणगाव प्रतिनिधी :- संत शिरोमणी संत रोहिदास यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंप्री खु ता धरणगाव येथील सम्राट गृप तसेच चर्मकार बांधव यांच्या समवेत अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती .

या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजू बीजबीरे यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले . तसेच या अभिवादन सभेस सँबोधन करतांना सतिश शिंदे ( युवा प्रचारक – शाहू फुले आंबेडकर विचारधारा ) यांनी संत रोहिदास यांच्या जीवनाचे उदाहरण दाखले देत समाज एकोप्याने राहण्यासाठी तसेच आपल्या महापुरुषांच्या आंदोलनाची मशाल तेवत ठेवण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे . विचार पुढे नेण्यासाठी आम्ही शिक्षणाची कास धरली पाहिजे . चांगल्या बाबींना विरोध करणारे असतात पण विरोध करणाऱ्यांना न जुमानता आपण आपल्या कार्यातून त्यांना चपराक मारावी . आपला उद्देश हा समाज हिताचा व सर्वांना एकसंघ ठेवण्याचा असावा , यावर प्रतिपादन केले.

अभिवादन सभेप्रसंगी


राजू बिजबिरे,कृष्णा मोरे,गौतम दोडे ,मनोज बिजबीरे,राज अहिरे,गणेश अहिरे,नितीन आढांगे,किशोर अहिरे,जयराम बीजबिरे,विजय दोडे,नाना दोडे,खंडू समशेर,राज समशेर,शुभम दोडे,मनोज बिजबीरे,जयराम बिजबीरे, तसेच महिलावर्ग , व तरुण बांधव उपस्थित होते

अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार विनोद बिजबीरे यांनी मानले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार