लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- शेतकऱ्यांनी भरलेला २०२२ खरीप हंगामाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड , यांच्या नेतृत्वात लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांसह ठीय्या आंदोलन करण्यात आले यावेळी लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावर्षी झालेल्या सतत धार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना सुरक्षा म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन काहींनी तर घरातील डाग दागिने गहाण ठेवून पीक विम्याची रक्कम भरली होती परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पिक विमा कंपनीच्या वतीने पीक विम्याची रक्कम देण्यात आली नाही.
काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम आली तर ती अतिशय कमी प्रमाणात आली आहे यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल तीन तास हे आंदोलन केले यावेळी तालुका कृषी अधिकारी सरोदे साहेब यांनी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून येत्या पंधरा दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम जमा होईल असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु दिलेल्या आश्वासनावर विमा कंपनी व कृषी विभागाने घुमजाव केल्यास विमा कंपनीचे कार्यालय व कृषी कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे यावेळी उपस्थित एडवोकेट योगेश जायभाये,राजेश नागरे,जीवन घायाळ सय्यद मकसूद,संदीप सरकटे,शिवनारायण राऊत,अशोक बोडखे दीपक गायकवाड,गणेश लाड ,दिलीप राठोड, प्रदीप गवई,दशरथ लाड,गणेश दराडे,गणेश सावळकर,सुनील धारकर,कैलास गीते,विशाल मोरे, दशरथ कायंदे,यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






