एरंडोल- म्हसावदकडून एरांडोलकडे भरधाव वेगाने येणा-या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकने झाडास धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रकचा चालक,क्लीनर जागीच ठार झाले.ट्रकचा भाग झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्यामुळे क्रेनच्या मदतीने चालकाचा मृतदेह काढण्यात आला.हा पघात गुरुवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील उमरदे गावाजवळ झाला.याबाबत माहिती अशी,की म्हसावद कडून एरंडोलकडे सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लोखंडी आसारी भरलेला ट्रक क्रमांक एम.पी. ११ एच.०८५२ भरधाव वेगाने येत होता.
उमरदे गावाजवळ ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने विरुद्ध दिशेच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडास जोरदार धडक दिली.ट्रकने झाडास धडक दिल्यांनतर ट्रकचा पुढील भाग चेपला जाऊन ट्रक पलटी झाला.या अपघातात ट्रकचालक प्रकाश गंगाराम बास्कले (वय-३०) आणि क्लीनर शाहरुख खान सोहिल खान (वय-१८) दोघेही राहणार धार,मध्यप्रदेश हे ठार झाले.यावेळी उमरदे येथील पोलीस पाटील शेखर साहेबराव जगताप आणि संदीप सुखदेव पाटील हे शेतात जात होते.त्यांच्यासमोरच ट्रकचा अपघात झाल्यामुळे त्यांनी अपघातस्थळी धावत जाऊन अपघाताची माहिती पोलिसाना दिली.
तसेच ट्रकवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून ट्रकच्या मालाकास अपघाताची माहिती दिली.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.अपघातामुळे जोरदार आवाज झाल्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरु केले.ग्रामस्थांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि झाडात अडकलेला चालक प्रकाश बास्कले यास बाहेर काढले तसेच गंभीर जखमी असलेल्या शाहरुख खान सोहिल खान याचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त ट्रक भरधाव वेगाने येत होता,पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर कोणीही नव्हते अन्यथा भीषण दुर्घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.याबाबत पोलीस पाटील शेखर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक प्रकाश बास्कले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






