भारतीय संविधान हे सर्व भारतीयांचे सुरक्षा व रक्षा कवच :अँड.रविंद्र गजरे सर

Spread the love


एरंडोल :- ऊत्राण,ता:एंरडोल येथील श्री.एस.बी.संघवी इंटरनँशनल स्कुल येथे संविधान दिना निमित्त विद्यार्थि व शिक्षकांसाठी व गावातील र्स्पधा परिक्षांचा अभ्यास करणारे तरूणांसाठी जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.


प्रसंगी गावातील आर्मी व पोलीस भरतीची तयारी करणारी तरूणांना सामाजिक कार्याचा वसा जोपासणारे सस्थेचे अध्यक्ष श्री देवमन माळी सर व ,सचिव शितल माळी मँडम यांनी र्स्पधा परिक्षांची पूस्तके व शुज भेट दीली.


आपल्या व्याख्यानात अँड.रविंद्र गजरे यांनी देशातील वर्तमान सामाजिक व धार्मिक परिस्थितिवर प्रकाशझोत टाकला.संविधानाने दीलेले हक्क व सर्व नागरिकांची जबाबदारी काय यावर विस्तृत कथन केले.


संविधान वाचा व देश वाचवा असे आवाहन केले.तसेच डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रूपाने देशाला भेट देवुन कशे महानतेच्या कळसावर विराजमान झाले हे ऊदाहरण दाखल सागितले.


.कार्यक्रमा साठी मिनल माळी ,प्राचार्य बुंदेले सर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांबळे सर यांनी केले व वक्त्यांचा परिचय भुषण जाधव यांनी करून दीला.कार्यक्रम यशश्वितेसाठी हीना मँडम,लीना मँडम,माळी सर यांचे सहकार्य लाभले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार