एरंडोल :- देशभरातील लाखो हिंदू व मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थू बापू मियां याना पांडवनगरी सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत भगवी चादर चढवण्यात आली.उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी उरुसानिमित्त मिरवणूक काढून वाजतगाजत नथ्थू बापुना अनेक वर्षांपासून भगवी चादर चढवण्यात येत आहे.देशभरातील लाखो हिंदू व मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थू बापूंच्या उरुसास सुरुवात झाली असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी शहरात येत आहे.पांडवनगरी सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी नथ्थू बापुंना भगवी चादर चढवण्यात येते.१ डिसेंबरला पांडववाडा येथून भगवी चादर मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी नथ्थू बापूंच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती.आमदार चिमणराव पाटील,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,बाजार समितीचे माजी सभापती शालिक भाऊ गायकवाड यांच्या हस्ते आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भगव्या चादरीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी डोक्यावर घातलेल्या भगव्या टोप्या आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांच्या हातातील नथ्थू बापूंचे छायाचित्र असलेले भगवे ध्वज मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते.
सर्व युवक शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत होते.मिरवणुकीत सहभागी झालेल्या पदाधिका-यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.यावेळी भाविकांनी विविध घोषणा दिल्या.सायंकाळी पाच वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री नऊ वाजेच्या सुमारास नथ्थू बापूंच्या उरूसस्थळाजवळ पोहोचली.यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष रमेश परदेशी,उपाध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,ट्रस्टी अशोक चौधरी,सुनील चौधरी,जावेद मुजावर यांचेसह पांडवनागरी सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यांचेहस्ते नथ्थूबापुंना भगवी चादर चढवण्यात आली.
पहा मिरवणुकीच्या व्हिडिओ
यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी विविध घोषणा देऊन जल्लोष केला.मिरवणुकीत बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),चिंतामण पाटील,रवींद्र जाधव,मयूर महाजन,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन,प्रमोद महाजन,परेश बिर्ला,राजा भेलसेकर, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,गोविंद बिर्ला,शंतनू भेलासेकर, भोला पवार, कुणाल पाटील,मयूर महाजन,नितीन बोरसे,मयूर बिर्ला,राजेश शिंपी,उमेश साळी,रवींद्र मराठे,पद्माकर मराठे,हर्जितसिंग जोहरी, करण पाटील,विजय सोनार,सागर महाजन,शिवाजी पाटील,चेतन बडगुजर,निवृत्ती महाजन,रोहित पवार बबलू चौधरी, यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो भाविक सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.दुपारी उरुसानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली.आमदार चिमणराव पाटील,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर यांच्याहस्ते कुस्तीस्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष रमेश परदेशी,उपाध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,सचिव जावेद मुजावर,अशोक चौधरी,शेनपडू वाल्डे,सुनील चौधरी यांचेसह सदस्य उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






