एरंडोल :- आज दि.03 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जि.प.उ.प्रा.शाळा टाकरखेडे ता.एरंडोल येथे प्रभातफेरी काढण्यात आली तसेच चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कु.रुपाली संदीप पाटील या दिव्यांग विद्यार्थिनीला चष्मा व लार्ज प्रिंट पुस्तकांचा संच देण्यात आला. यावेळी शाळेतील दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच आदरणीय श्री. प्रविण भाऊ पाटील होते. यावेळी शिक्षण प्रेमी श्री. वसंत भाऊ पाटील रिंगणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय श्रीमती मनीषा सोनवणे मॅडम, गट साधन केंद्रातील श्री.गुरुदास शिंपी ( तालुका समन्वयक) , विशेष शिक्षक श्री.भिमराव भालेराव सर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अभिमन पाटील सर यांनी केले. दिव्यांग शिक्षक श्री.चंद्रकांत पाटील सर व श्री.गणेश महाजन सर यांनी मनोगत व्यक्त केले.तर सूत्रसंचालन श्री. दीपक जाधव सर यांनी केले.यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले. व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. पद्माकर पाटील यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप केला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






