लोणार/उध्दव आटोळे.
लोणार :- तालुक्यातील बिबी ते मांडवा या रोडवर दोन पुलाचे अर्धवट काम असल्यामुळे वाहनधारकांना नाहाकच त्रास सहन करावा लागत आहे.या पुलाचे अर्धवट काम असल्यामुळे या रोडवर बिबी ते मलकापूर वाहन जात असताना या पुलावर असलेल्या खड्डा मुळे वाहनाचा नुकसान सोबत अपघात चे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे बऱ्याच वाहनाचे नुकसान झाले आहे गेल्या काही वर्षापासून पुलाचे काम अर्धवटच आहे या पुलावर डांबरीकरण न झाल्यामुळे या पुलावर खड्डे तयार झालेले आहे.पुलाकडे संबंधित अधिकारी का दुर्लक्ष करीत आहे याचा त्रास वाहनधारकांना होत आहे.
संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाली असेल असा संशय या अर्धवट झालेल्या कामामुळे नागरिकांना येत आहे. गेल्या दोन वर्षापासून हे काम अर्धवट आसुन याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी अनेक वेळा मोटरसायकल घसरून अनेक जण जखमी झालेले आहे. त्यामुळे या पुलाकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन त्वरित राहिलेले अर्धवट फुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी बिबी व मांडवा ग्रामस्थ व वाहनधारकांकडून होत आहे.जर या पुलावर एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार राहील अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






