लांजा / ५ डिसेंबर २०२२
लांजा : विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, दापोली येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी जागतिक मृदादिनाचे औचित्य साधुन लांजा तालुक्यातील कोट व वेरळ गावातील ‘कृषि दुत’ व ‘कृषक सोबती’ अशा दोन गटाने 5 डिसेंबर जागतिक मृदा दिनी नागरिकांना व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मातीपरिक्षणाची माहिती दिली व त्याचे प्रात्यक्षिक दाखविले माती परीक्षणाचे फायदे सांगितले,
गांडूळ खत बनविणे आणि त्याचा उपयोग कसा करावा त्याचे फायदे काय या विषयी माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचे महत्व पटवून दिले .
या कार्यक्रमास सर्व ग्रामस्थांचा व शाळेतील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. हे सर्व प्रात्यक्षिक कृषि महाविद्यालय, दापोली व कृषि विज्ञान केंद्र,लांजा यांच्या मार्गदर्शना अंतर्गत साजरे करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी उत्तम सहकार्य केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






