महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

Spread the love

एरंडोल- महापरिनिर्वाण दिनानिमित शहरातील विविध शैक्षणिक संस्था,राजकीय पक्ष,पंचशील मित्र मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण,पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव, अंग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम,संचालक कमरअली सय्यद,प्रा.नरेंद्र गायकवाड,भीमराव सोनावणे, विठ्ठल आंधळे,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, प्रविण केदार,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस राजेंद्र शिंदे,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,

अमोल जाधव,सचिन विसपुते,ईश्वर बी-हाडे,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,पत्रकार आल्हाद जोशी कैलास महाजन,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय चौधरी,मयूर महाजन,गोविंद बिर्ला यांचेसह विविध राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच पंचशील मित्र मंडळ घ्या कार्यक्रते उपस्थित होते.तसेच दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय,रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिर,माध्यमिक विद्या मंदिर,गोपीगोल्ड इंग्लिश मेडियम स्कूल,न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,रा.ति.काबरे विद्यालय यासह सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

हे पण वाचा

टीम झुंजार