एरंडोल: तालुक्यात पिंपळकोठा प्र.चा, रवंजे खुर्द, रवंजे बुद्रुक, दापोरी,अंतुरली खुर्द, व जवखेडे सिम अशा सहा ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत आज माघारीच्या शेवटच्या दिवशी जवखेडे सिम ग्रामपंचायतची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे तर उर्वरित पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकिसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
पिंपळकोठा प्र.चा. या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी पाटील गिताबाई प्रल्हाद व पाटील प्रतिभा आनंदा या उमेदवारांमध्ये लढत आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण तीन वार्डातील 9 जागेसाठी निवडणूक होणार आहे यामध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये तीन जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत वार्ड क्रमांक दोन च्य तीन जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत वार्ड क्रमांक तीनच्या सहा उमेदवार रिंगणात आहेत.
अंतुरली खुर्द या ग्रामपंचायत साठी सरपंच पदासाठी कांतीलाल गणसिंग सोनवणे व उत्तम विठ्ठल बाविस्कर यांच्यात लढत आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या तीन वार्डामधून एकूण सात जागेसाठी निवडणूक होत आहे यामध्ये वार्ड क्रमांक एकच्या तीन जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत वार्ड क्रमांक दोन मध्ये चार उमेदवार रिंगणात आहेत तर वार्ड क्रमांक तीन मध्ये दोन जागे पैकी एक जागेवर अनिल आधार जवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर या वार्डातील एका जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत आहे.

दापोरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी कुंदन सखाराम कोळी व प्रवीण पुंडलिक पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या तीन वार्डाचा सात जागेसाठी निवडणूक होत आहे यामध्ये वार्ड क्रमांक एक च्या तीन जागेसाठी निवडणुकीत रत्नाबाई अरुंन भिल व सोनवणे महेंद्र भिका यांची बिनविरोध झाली आहे तर या वार्डातील एका जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत आहे. वार्ड क्रमांक दोन च्या दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत तर वार्ड क्रमांक तीनच्या दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.

रवंजे बुद्रुक या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ज्ञानेश्वर भगवान कोळी व नामदेव आधार माळी या दोघांमध्ये लढत आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या तीन वार्डामधून नऊ जागेसाठी निवडणूक होत आहे यामध्ये वार्ड क्रमांक एक मधील तीन जागेसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत वार्ड क्रमांक दोन मध्ये तीन जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत वार्ड क्रमांक तीन मध्ये सहा उमेदवार रिंगणात आहेत.
रवंजे खुर्द या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी वैशाली भागवत पाटील व सुरेखा देविदास चौधरी या दोघांमध्ये लढत आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या तीन वार्डामधून सात जागेसाठी निवडणूक होत आहे. वार्ड क्रमांक एक मधील तीन जागे मधून एक जागी अनिता चंद्रभान पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उर्वरित दोन जागेसाठी चार उमेदवारांमध्ये लढत आहे वार्ड क्रमांक दोन मधील दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत तर वार्ड क्रमांक तीन मधील दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.

एरंडोल तालुक्याचे लक्ष असलेल्या जवखेडे सिम ही ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली आहे. उ.बा.ठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचे समर्थक यांच्यामध्ये सरळ लढत होती. पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती अनिल महाजन व उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, मुकुंदा पाटील व गावातील वयोवृद्ध नागरिक यांनी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.
सरपंचासह सर्व जागा बिनविरोध झाल्या परंतु एका जागेसाठी प्रल्हाद चिंतामण सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध होणार नाही असे चित्र निर्माण झाले होते. प्रल्हाद सोनवणे यांना एक तास गावातील नागरिक व पदाधिकारी यांनी समजल्यामुळे शेवटी चार वाजता त्यांनी माघार घेतल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये सरपंचासह सर्व सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत निवडून आलेल्या

सरपंचासह सदस्यांची नावे
सरपंच ठगुबाई रमेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्यांची नावे सोनीराम बन्सी ठाकरे, वंदना रवींद्र चव्हाण, भाऊसाहेब उत्तम शिंदे, संगीता विकास सूर्यवंशी, सुवर्णा संजय सूर्यवंशी, रवींद्र सुकलाल चौधरी, सुशीला नामदेव सोनवणे, अर्जुन भागवत भदाणे, सुनंदा बालूराम आमले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जवखेडे सिम ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार होती. राजकीय पदाधिकाऱ्यांची समजदारी गावातील वयोवृद्ध नागरिकांचे सहकार्य
व माघारीच्या दोन तासाच्या नाटकीय घडामोडी नंतर सरपंच उपसरपंच पदाची वाटणी नंतर शेवटी ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली.






