एरंडोल : दि.07/12/2022 रोजी कासोदा कक्षातील कासोदा गावामध्ये वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली, या मोहिमेमध्ये मेन गल्ली व बाजारपट्यातील व्यावसायिक व घरगुती एकूण 107 वीज कनेक्शन चेक करण्यात आले. या मध्ये 25 मीटर मध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले व ते मीटर टेस्टिंग साठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मिटर किती प्रमाणात कमी फिरते यावरून वीजचोरीच्या बीलाची आकारणी करण्यात येणार आहे.. तसेच वीजचोरीचे बील त्वरीन न भरल्यास विद्युत कायदा २००३ अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदर मोहीम प्रभारी मा. कार्यकारी अभियंता धरणगाव श्री. जोगी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात
सहाय्यक अभियंता कासोदा कक्ष श्री. राहुल पाटील, श्री. प्रशांत महाजन, श्री जयदिपसिंग पाटील, श्री इच्छानंद पाटील, कु.लक्ष्मी माने मॅडम व कासोदा कक्षाचे सर्व जनमित्र सहभागी झाले व मोहिम यशस्वीपणे पार पाडली… सदर कारवाईमुळे वीजचोरां मध्ये प्रचड दहशत निर्माण झाली..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






