नाशिक :- सध्या महाराष्ट्रात सह नाशिक जिल्ह्यात बस अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून तीन किमी अंतरावर भीषण अपघाताची Nashik ST Accident घटना घडली. येतील शिंदे पळसे गावाच्या हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचे ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घघटना घडली असून नाशिक शहरापासून केवळ ६ ते ७ किमी अंतरावरील हा अपघात आहे.

अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून राग झाली बसमधील काही प्रवाशांचा होरफळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी करण्यात आले आहे. जखमींवर बिटको हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
पहा व्हिडिओ :
व्हिडिओ :
बस चालकाशी संवाद
दरम्यान, राजगुरुनगर-नाशिक बसचे बसचालक राजेंद्र अंबादास उईके, महिला वाहक आशा शेळके दोघेही सुखरुप आहेत. पळसे चौफुलीच्या बस थांब्याजवळील गतीरोधक पाहून मी बसचा ब्रेक दाबला, पण बसचा ब्रेक न लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरील बसवर ही बस धडकली, असे बसचालक राजेंद्र उईके यांनी लोकमतच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
बस अपघातात जखमी झालेल्या राजगुरू नगर-नाशिक बस मधील प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे
हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेररुपाली सचिन दिवटे, अकोलेसमृद्धी सचिन दिवटेसईदा इनामदार, संगमनेरमुस्तफा शेख, संगमनेरनसमा जहाँगिरदार, संगमनेरऔवेस अहमद, धारावी मुंबईसिताराम देवराम कुरणे, सिकर
या सर्व प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
# हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






