जळगावः जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जळगावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आज या लढतीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दूध संघाच्या 20 जागांसाठी मतदानाला साकळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण पाहता, शिंदे-भाजप गटासाठीदेखील ही लढाई सोपी नाही. त्यामुळे या राजकीय आखाड्यात कोण विजयी ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
दूध संघाच्या मतदान प्रक्रिया आज सकाळी ८ वाजेपासून पार पडत आहे. या निवडणुकीला 441 जण मतदान करणार आहेत. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले आहे. या केंद्रावर 44 जण मतदान करणार आहेत.
जळगाव दूध संघ निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील सत्य वॉलभ मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला असल्याचे पाहायला मिळाले दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस पहायला मिळतेय. एकनाथ खडसे या निवडणुकीत एकटे पडल्याचं चित्र आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार खडसे यांच्याविरोधात आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






