पातरखेडे येथे साडेचार लाख रुपयाची धाडसी घरफोडी

Spread the love


एरंडोल :- तालुक्यातील पातरखेडे येथे बळवंत दिनकर पाटील रा. पातरखेड हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख साडेचार लाख रुपये व चांदीचे शिक्के दरवाज्याच्या कडी कोंडा तोडून घेऊन पसार झाला. पातरखेडे येथील रहिवासी बळवंत दिनकर पाटील वय वर्ष ५८ हे पत्नी यांच्यासह पातरखेडे येथे राहत असून शेतीच्या व्यवसाय करुन उदर निर्वाह करतात मोठा मुलगा निलेश हा पुणे येथे राहतो. तर लहान मुलगा विजय हा मुंबई येथे नोकरी करतो.

दिनांक 3 डिसेंबर रोजी साडेसात वाजेच्या सुमारास पत्नी सह मोठ्या मुलाकडे पुणे येथे गेले होते घरात लोखंडी कपाटात शेतीचे उत्पन्नाचे पैसे लॉकर्स मध्ये सुमारे साडे चार लाख रुपये व चांदीचे शिक्के होते. आठ डिसेंबर रोजी भाऊ चिंतामण याला घरावर लक्ष ठेवण्याचे फोन केला असता व्यवस्थित असल्यास चे त्यांनी सांगितले दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता चिंतामण पाटील यांनी फोन करून सांगितले की तुझ्या घराचे लोखंडे सेफ्टी दरवाजे कडी कोंडा तुटलेला असून दरवाजा उघडा आहे.

मुलगा निलेश याच्यासह पुणे येथून निघून संध्याकाळी ६.३० सुमारास पातरखेडा येथे पोहोचले लोखंडी सेफ्टी गेटचा दरवाजा उघडा होता.कडी कोंडा तुटलेला होता घरात जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाट चे लाँकर तोडलेले होते.कपाटातील लाँकर मध्ये ठेवलेले ४ लाख ५० हजार रुपये रोख व चांदीचे शिक्के दिसले नाही याची खात्री झाली माझ्या घरातील अज्ञात चोरट्यांनी यांनी घरातील दरवाजाच्या कडी कोंडा तोडून प्रवेश करून सदरची रक्कम व चांदीचे शिक्के चोरून नेले

नोटांचे वर्णन ४ लाख ५० हजार रुपये यात २००० च्या१०० चलनी नोटा ५०० च्या ,१०० चलनी नोटा १००० रुपये रकमेचे चांदीचे दोन शिक्के त्यावर महालक्ष्मीचे चित्र असे एकूण ४ लाख ५१ हजार अज्ञात चोरट्यांनी चोरून घोरपडी केली आहे
यांनी दिलेल्या फिर्यादीमधून वरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार