एरंडोल: – जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, कठोर परिश्रम आणि ध्येय निश्चित असावे असे आवाहन येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आवाहन केले.
एरंडोल येथील अंजूमन-ए-इस्लाम ट्रस्टद्वारे संचलित अँग्लो उर्दू हायास्कूल आणि ज्यू. कॉलेजमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांची एम. डी. साठी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. निशात शेख यांची नांदेड येथे एम. एस. साठी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी डॉ. फिरोज शेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष जहिरोद्दीन शेख होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष शालिग्रामभाऊ गायकवाड उपस्थित होते.
डॉ. फिरोज शेख शांत, सुस्वभावी, मेहनती व्यक्तीमत्व असून एरंडोल ग्रामीण रूग्णालयासह तालुक्यात उल्लेखनिय कामगिरी केली असल्याच्या मान्यवरांनी मनोगतात सांगितले. सदरप्रसंगी संस्था सचिव शकिलोद्दीन शेख, उपाध्यक्ष जाकीर सैय्यद, शेख शकील, हाजी लतीफ शेख, यासिन शेख, मुशिरोद्दीन शेख, प्राचार्य आयाज शेख, संचालक पत्रकार कमरअली सैय्यद, पत्रकार संजय चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचे यावेळी आवाहन देखील करण्यात आले. यावेळी पालकांसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक़्रमाचे प्रास्ताविक शेख शकिलोद्दीन यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य शेख सर यांनी केले. सूत्रसंचलन सलिम सर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, कर्मचारींनी परिश्रम घेतले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






