जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.
वृषभ :-
तब्येतीला जपा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील.
मिथुन :-
मनासारखी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.
कर्क :-
आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.
सिंह :-
मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये.
कन्या :-
कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.
तूळ :-
आपल्याच मुद्यावर अडून राहाल. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल. मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.
वृश्चिक :-
गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल.
धनू :-
धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्या चिकाटीने पार पाडाव्यात.
मकर :-
कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
कुंभ :-
समोरील संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.
मीन :-
अनावश्यक खरेदी केली जाईल. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






