ब्राम्हण संघर्ष यात्रेचे एरांडोलात भव्य स्वागत, बहुभाषिक ब्राम्हण समाज बांधवांची उपस्थिती..

Spread the love

एरंडोल-ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्या घेवून माहूरगडावरून निघालेल्या ब्राम्हण समाज संघर्ष यात्रेचे शहरात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी एरंडोल,धरणगाव येथील बहुभाषिक ब्राम्हण समाजाचे पदाधिकारी,महिला,आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्या घेवून माहूरगड येथून ब्राम्हण समाज संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे.मुबई येथे यात्रेचा समारोप होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे.ब्राम्हण समाज संघर्ष यात्रेचे शहरातील अमळनेर दरवाजा परिसरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी ब्राम्हण शिखर महापरिषदेचे अध्यक्ष तथा संघर्ष यात्रेचे प्रमुख सचिन वाडेपाटील यांनी ब्राम्हण समाजासमोरील आव्हाने,युवकांच्या समस्या,समाजातील राष्टपुरुषांच्या चारित्र्यावर होणारी चिखलफेक याबाबत माहिती देऊन संघर्ष यात्रा काढण्याबाबत भूमिका स्पष्ट केली.यावेळी भाजाचे लोकसभा प्रवास योजनेचे मुख्य समन्वयक तथा जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,डॉ.अविनाश कुलकर्णी,डॉ.किशोर भावे यांचेसह प्रमुख पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करून संघर्ष यात्रेचे स्वागत केले.यात्रेचे प्रमुख सचिन वाडेपाटील यांचे स्वागत शेखर बुंदेले यांनी केले.advt.किशोर काळकर यांचा यात्रेचे प्रमुख सचिन वाडेपाटील यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास डॉ.सुहास अग्निहोत्री,किरण तिवारी,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी,विशाल तिवारी,लोटन पटवारी,दिनेश दुबे,डॉ.गोपाल पांडे,ज्ञानेश्वर खुरे,डॉ.अविनाश कुलकर्णी,डॉ.किशोर भावे,धरणगावचे ब्राम्हण समाज अध्यक्ष हेमंत जोशी,डॉ.प्रशांत भावे, निलेश पाठक,पाचो-याचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, उद्योजक मुकुंद बिल्दीकर,जितेश नाईक, किशोर जोशी, किशोर कुलकर्णी,प्रा.प्रकाश कुलकर्णी,श्रीकृष्ण जोशी,चंद्रकांत जोशी,नितीन दुबे,भूषण जोशी,रश्मी दंडवते, प्रा.उज्वला देशपांडे,सोनाली कुलकर्णी,शिल्पा पाठक यांचेसह सर्वशाखीय ब्राम्हण समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी एरंडोल,धरणगाव,पाचोरा,चाळीसगाव येथील ब्राम्हण समाजाच्यावतीने संघर्ष यात्रेस पाठींबा असल्याचे पत्र यात्रा प्रमुखांकडे सोपवण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार