एरंडोल :- शहर कक्षातील एरंडोल येथील पाताळनगरी व मुजावर वाडा या भागात वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली, या मोहिमेमध्ये 2 रोहित्रावरील फ्यूज दररोज जात असलेल्या भागातील एकूण 151 घरगुती वीज कनेक्शन चेक करण्यात आले. या मध्ये 51 मीटर मध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात 250 असे एकूण 76 वीज ग्राहकांचे मीटर टेस्टिंग साठी ताब्यात घेण्यात आले आहे. मीटर मध्ये वीज चोरी आढळल्यास वीज चोरीचे देयक सदर ग्राहकांना अदा करण्यात येतील व सदर वीज बिल न भरल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येतील.
सदर मोहीम मा. कार्यकारी अभियंता धरणगाव पवार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता प्रशांत महाजन, राहुल पाटील, जयदिपसिंग पाटील, युवराज तायडे, लक्ष्मी माने मॅडम व एरंडोल शहर कक्षाचे सर्व जनमित्र सहभागी झाले व मोहिम यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी सांगितले की ज्या वीज ग्राहकांचे मीटर आत्ता बदलले आहे त्या मीटरमध्ये ग्राहकांनी काही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास अश्या वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर सरळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






