जळगाव : – सध्या महाराष्ट्रात बस अपघाताच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच अमळनेरहून गुजरातला सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस उलटली.महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ ही घटना घडलीय. यामध्ये सुमारे 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजता सुमारास अपघात झाल्याची माहिती निझर पोलिसांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला.बसमध्ये दहावीत शिकणारे 51 विद्यार्थी आणि शिक्षकांसह 65 प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली, बस विजेच्या खांबाला धडकून उलटली.
यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे.अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते. विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच निझर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






