भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने धरणगावात तीव्र आंदोलन

Spread the love

धरणगाव :- येथे उबाठा सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेनीं समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावतील असे जाहीर वक्तव्य संत ज्ञानेश्वर माऊली व हिंदू देव-देवितावर केले त्याबाबत महाराष्ट्रत सर्वच स्तरावर उबाठा सेनेच्या सुषमा अंधारे यांचा निषेध होत आहे.धरणगावात देखील त्यांची अंत्ययात्रा काढून पुतळा जाळण्यात आला.
त्याचबरोबर पाकिस्तानचे बिलावल झरदारी यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज धरणगाव येथे बिलावल झरदारी व यांचा प्रतिकात्मक पुतळ्याची अत्यंयात्रा काढण्यात आली,

दोघांची काढली अंत्ययात्रा
सुषमा अंधारे व बिलावल झरदारी या दोघांच्या अंत्ययात्रेत तिरडीला मा.नगराध्यक्ष कल्पना महाजन व महिला शहराध्यक्ष भारती चौधरी यांनी खांदा दिला आंदोलनाचे नेतृत्व भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन,शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर,शिवसेना महिला तालुकाध्यक्ष मायाबाई सोनवणे,यांनी केले.अंत्ययात्रेच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ सुषमा अंधारे व पाकिस्तानचे बिलावल झरदारी यांचा पुतळा जाळण्यात आला.

त्याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन पाटील,इत्यादी सह भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाने देखील या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहभाग घेतला
ह.भ.प.जितु महाराज यांनी निषेध व्यक्त करतांना संताप केला त्यांच्यासोबत ह.भ.प.आर.डी. महाजन सर,गोलू महाराज इत्यादी उपस्थित होते.

टीम झुंजार