कंडारी बु. महिला सरपंच तथाकथित विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर..

Spread the love

धरणगांव प्रतिनिधी / सतिष शिंदे

धरणगाव:- कंडारी बू. ता. धरणगाव येथील दि.३०/११/२०२२ रोजी ग्रामसभेत झालेल्या वादाप्रसंगी महिला सरपंच यांना घरकुल योजनेत नावे वगळल्या बाबत आरोपी ताहेर पटेल, शौकत पटेल व ईतर यांनी प्रश्न उपस्थीत केले व त्यातुन झालेल्या वादात धरणगाव पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. कलम १४३,१४७,१४९,३५४,३२७ व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल होता. त्यात आरोपींना अटक करून धरणगाव कोर्टापुढे हजर करण्यात आले.


आरोपींचा जामीन अर्ज ॲड. गजानन बी. पाटील यांच्या मार्फत दाखल करण्यात आला व त्यावर आरोपींतर्फे प्रदिर्घ युक्तीवाद करण्यात आला व सदर गुन्ह्यात खोट्या पद्धतीने आरोपींना कसे गोवण्यात आले हा ॲड. पाटील यांचा युक्तिवाद न्यायाधिश श्री.अविनाश ढोके यांनी ग्राह्य धरत जामीन मंजूर केला.


सरकारी पक्षातर्फे ऍड. सौ. हटकर तसेच आरोपींतर्फे ॲड. गजानन बी. पाटील(पिंप्री ) यांनी काम पाहिले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार