एरंडोल:- येथील बचपन प्ले स्कूलच्या कौन्सिलर प्रा.सौ.सुरेखा पाटील यांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून राष्ट्रीय पुरस्कार पटकावून दुस-यांदा एरंडोलचे नाव देशभरात लौकिक केले.या पुरस्कारासाठी देशभरातील १६०० हून अधिक शाळांनी नामांकन केले होते. त्यातून मोजक्याच शाळांपैकी बचपन स्कूल एरंडोल येथील, कौन्सिलर प्रा. सौ. सुरेखा प्रमोद पाटील यांना सलग दुसऱ्यांदा हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र विविध क्षेत्रातून मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे व पुढील उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दरवर्षी काही निवडक शाळांना राष्ट्रीय स्तरावरून विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. सदर पुरस्कार रविवारी रोजी सप्त तारांकित हॉटेल रॅडिसन ब्ल्यू , नवी दिल्ली येथे प्रसिद्ध अभिनेत्री (दृश्यम-2 फिल्म) मिस इशिता दत्ता यांच्या हस्ते नॅशनल “मेस्ट्रो अवाॅर्ड २०२२” सौ.पाटील यांना प्रदान करण्यात आला.प्रसंगी दिल्ली एज्युकेशन बोर्ड पॅनल डायरेक्टर व सिईओ मा.डाॅ.अजय गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.पुन्हा सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावरील उस्ताद झाले आहेत.
राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींनाच पुरस्कार देण्यात येतो.दिल्लीहून एरंडोल नगरीत सौ.सुरेखा पाटील मॅडम यांचे आगमन होताच, शाळेचा सर्व स्टाफ विद्यार्थी व पालकवर्ग चाहत्यांकडून त्यांचे धरणगाव चौफुलीवर फटाक्यांच्या आतिशबाजी व ढोल ताशांनी जंगी स्वागत केले अवॉर्ड मिळाल्याने शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक व शाळा प्रशासन यांच्यात आनंदोत्सव साजरा होत आहे.सलग दुसऱ्यांदा अवॉर्ड पटकविणाऱ्या सौ. सुरेखा पाटील मॅडम या महाराष्ट्रातील पहिल्याच उमेदवार महिला आहेत.







