Video :अनोखा विवाह: ‘योगीं’ना हुंड्यात मिळाला ‘बुलडोझर’; कारणही आहे खास

Spread the love


लग्नात वराला हुंड्यात अलिशान कार किंवा इतर तत्सम वस्तू दिल्याचे तुम्ही पाहिले अथवा ऐकले असेल. मात्र, एका लग्नात चक्क वधूच्या वडिलांनी योगींना हुंड्यात योगींना बुलडोझर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील हमीपपूरमध्ये वराला वधू पित्याकडून हुंड्यामध्ये भेट म्हणून बुलडोझर दिला. यानंतर लग्न मंडपात उपस्थित पाहुण्यांनी योगी बाबा झिंदाबादच्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे वर भारतीय नौदलात कार्यरत आहे. तर, वधूदेखील स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. लग्नाची भेट म्हणून वराला बुलडोझर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमका प्रकार काय?
हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देवगाव येथील रहिवासी परशुराम प्रजापती भारतीय लष्करात कार्यरत आहेत. त्यांनी त्यांची मुलगी नेहा प्रजापती हिचे लग्न भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या योगेंद्र यांच्यासोबत करण्याचे निश्चित केले.शुक्रवारी लग्नाचे इतर विधी आटोपल्यानंतर वधूच्या वडिलांनी वराला चक्क बुलडोझर गिफ्ट दिले. ही भेट पाहून वऱ्हडीदेखील आचंबित झाले. यावेळी उपस्थित काही वऱ्हाडींनी योगी बाबा जिंदाबादच्या घोषणा दिल्या. भेट म्हणून गाडी ऐवजी बुलडोझर चांगला असल्याचे आणि उपयोगी असल्याचे मत वऱ्हाडींनी व्यक्त केले आहे.

म्हणून बुलडोझर भेट म्हणून दिला
योगेंद्र योगी आणि नेहा प्रजापती यांच्या लग्नात भेट म्हणून मिळालेला बुलडोझर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मुलगी नेहाला भेट म्हणून ‘कार’ दिली असती, तर दारातच उभी राहिली असती, पण ‘बुलडोझर दिल्याने तो अनेक कामांसाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. यातून उत्पन्नही सुरू होईल असे कारण वधूच्या वडिलांनी दिले आहे.

नव्या परंपरेला सुरुवात
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ओळख ‘बुलडोजर बाबा’ अशी झाली आहे. त्यात पार पडलेल्या वराचे नाव योगेंद्र चक्रवर्ती असे आहे. योगेंद्र यांना प्रेमाने योगी असे संबोधले जाते. त्यात लग्नात वधूच्या वडिलांकडून भेट म्हणून बुलडोझर देण्यात आल्याने, भेट देण्याच्या परंपरेत एका नव्या गोष्टीला सुरूवात झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच सध्या उत्तर प्रदेशात बुलडोझरची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मुख्यमंत्री योगींची आणि भेट मिळालेल्या बुलडोझरची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार