देवेंद्र साळी यांनी अमिताभ बच्चन यांना दिली गणपतीची प्रतिमा भेट.

Spread the love

एरंडोल- येथील गांधीपुरा भागातील दत्त मंदिर परिसरातील मूळ राहिवासी तथा किर्गीस्तान देशाचे भारतातील मुख्य राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेवून त्यांना गणपतीची प्रतिमा भेट दिली.

किर्गीस्तांचे राजनैतिक अधिकारी डॉ.देवेंद्र साळी यांचे मित्र दीपक हे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे सुमारे तीस वर्षांपासून मेकअप man (वेशभूषाकार) आहेत.त्यांनी देवेंद्र साळी याना १२ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर येण्याचे आमंत्रण दिले.डॉ.देवेंद्र साळी यांनी कौन बनेगा करोडपती सेटवर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेवून त्यांना आर्ट डायरेक्टर नंदू आठवले यांनी हाताने तयार केलेली ‘सिद्ध हस्त गणेश’ प्रतिमा भेट दिली.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी देवेंद्र साळी यांचेशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या कार्याबाबतची माहिती जाणून घेतली.यावेळी डॉ.देवेंद्र साळी यांनी भारत आणि किर्गीस्तान या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.सुपरस्टार अमिताब बच्चन यांची भेट घेतल्यामुळे काम करण्याबाबत मोठी उर्जा मिळाली असल्याचे डॉ.देवेंद्र साळी यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन यांचा या वयातही काम करण्याचा उत्साह सर्वाना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.युवकांना लाजवेल अशी त्यांची कार्यशैली आणि काम करण्याची पद्धत असल्याचे सांगितले.’कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे आगमन होताच सेटवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमधून ए.बी.च्या घोषणा दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

अमिताभ बच्चन यांच्या भेटीमुळे आणि त्यांनी दिलेल्या टिप्समुळे मानसिक आनंद मिल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.सुमारे दहा मिनिटे अमिताभ बच्चन आणि डॉ.देवेंद्र साळी यांची भेट झाली.देवेंद्र साळी यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून कोरोनाच्या संकटात आदिवासी वस्तीतील लहान बालकांना बिस्कीट सह जीवनसत्व असलेल्या विविध औषधांचे वाटप केले होते.श्री क्षेत्र पदमालय येथील गणपती मंदिराच्या सभागृहात त्यांनी आकर्षक असे झुंबर भेट दिले आहे.

टीम झुंजार