अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन महिला आमदार विधानसभेत ; व्हिडिओ झाला व्हायरल

Spread the love


नागपूर : हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका घटनेनं आज महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. नाशिकच्या देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे आपल्या दोन महिन्यांच्या नवजात बाळाला घेऊन विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्याच्या या उपक्रमाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरोज अहिरे यांचं बाळ अडीच महिन्यांचं असूनही त्यांनी हिवाळी अधिवेशनात उत्साहाने हजेरी लावली. यादरम्यान, अधिवेशनात  जातानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यांचे लक्ष वेधून घेतला आणि आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी झोपलेल्या बाळाला आपल्या मिठीत घेतलेले दिसले.

पहा व्हिडिओ :

दरम्यान, राज्यात कोणतही सरकार असलं तरी मतदारसंघातील प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी बाळाला घेऊन इथे आले. विधान भवन परिसरात फिडिंग रुम किंवा हरकणी कक्ष असावा, अशी मागणी मी आणि नमिताताई मुंदडा यांनी केल्याची प्रतिक्रिया सरोज अहिरे यांनी दिली.

नागपूरचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू झाले. दरम्यान, भाजप सरकार आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी रविवारी पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकला.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार