मुंबई : – सध्या देशात सोशल मीडिया वर रोज अपघाताचे नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.डंपरच्या धडकेत एका हातगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा बंदराजवळील अरुंद रस्त्यावर घडलीय. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान, याबाबत वर्सोवा पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला सीसीटीव्ही फुटेच्या आधारे अटक केली आहे.

नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मासळीची हातगाडीवरून वाहतूक करणारा हातगाडी चालक वर्सोवा बंदराकडे निघाला होता. यावेळी पाठीमागून सुसाट वेगात आलेल्या डंपरने त्याच्या हातगाडीला जोरात धडक दिली. रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीची भिंत आणि हातगाडी यांच्यामध्ये हातगाडीचालक दाबला गेला, या दुर्देवी अपघातात हातगाडी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला.
पहा व्हिडिओ :
या संपूर्ण घटनेचा थरार त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV) कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मयत हातगाडी चालकाचे शव महापालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आरोपी डंपर चालक अमीनदीन दरेसाहेब दर्गा वय (57 वर्ष) यास अटक केली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






