एरंडोल तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत युवकांना संधी. दिग्गजांना धक्का

Spread the love

एरंडोल- तालुक्यातील दापोरी,रवंजे खुर्द,रवंजे बुद्रुक,पिंपळकोठा.प्र.चा,अंतुर्ली खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी युवकांना संधी दिली.सरपंचपदाची निवडणूक थेट मतदारांमधून असल्यामुळे सर्वत्र चुरशीची लढत झाली.काही उमेदवारांना अल्पशा मतांनी पराभव पत्करावा लागला.निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी सकाळी तहसीलदार कार्यालयात करण्यात आली.यावेळी तहसीलदार कार्यालय परीसरात ऊमेदवारांचे समर्थक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.निकाल जाहीर होताच विजयी उमेदावारांचेसामार्थ्क जल्लोष करीत होते.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

पिंपळकोठा प्र.चा.येथील सरपंचपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.यामध्ये गीताबाई प्रल्हाद पाटील यांनी प्रतिभा आनंदा पाटील यांचा केवळ सहा मतांनी पराभव केला.दापोरी येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत कुंदन सखाराम कोळी यांनी प्रविण पुंडलिक पाटील यांचा पराभव केला.अंतुर्ली खुर्द येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत कांतीलाल गणसिंग सोनवणे यांनी उत्तम विठ्ठल बाविस्कर यांचा पराभव केला.

रवंजे खुर्द येथे सुरेखा देविदास चौधरी यांनी वैशाली भागवत पाटील यांचा पराभव केला.तर रवंजे बुद्रुक येथे नामदेव आधार माळी यांनी ज्ञानेश्वर भगवान कोळी यांचा पराभव केला.

गावाचे नाव व विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.-

रवंजे खुर्द-सरपंच-सुरेखा देविदास चौधरी,विजयी ग्रामपंचायत सदस्य-शिवाजी पंडित कुंभार,सुपडा दत्तू खामकर,सुरेखा देविदास कोळी,सुशीला प्रकाश चौधरी,धर्मा हिम्मत कोळी,प्रमिला सुभाष कोळी,अनिता चंद्रभान पाटील.

रवंजे बुद्रुक-सरपंच-नामदेव आधार माळी.विजयी ग्रामपंचायत सदस्य-बारकू शामराव निकम,संगीता विनोद कोळी,अंजना संजय मराठे,संदीप दयाराम तायडे,सुरेश वसंत चौधरी,सुशीलाबाई पंडित धनगर,इफ्तेखार मुख्तार तांबोळी,जिजाबाई भगवान भिल,सुजाताबाई सुनील धनगर.

पिंपळकोठा प्र.चा.सरपंच-गीताबाई प्रल्हाद पाटील.विजयी ग्रामपंचायत सदस्य.-रामलाल काळू साळुंखे,परविनाबी अब्दुल पटेल,जाकीर तय्यब मुजावर,राजश्री अनिल पाटील,भूरालाल मोहन पाटील,जाकीर अजित पटेल,योगिता कमलेश पाटील,सुलताना जमील पटेल,शाहिस्ता अफरोज पटेल.

दापोरी-सरपंच-कुंदन सखाराम कोळी विजयी ग्रामपंचायत सदस्य-ललिता भीमराज कोळी,मुकेश उत्तम मराठे,अनिताबाई नंदलाल पाटील,प्रदीप नथ्थू पाटील,ज्योतीबाई किशोर पाटील.

अंतुर्ली खुर्द-सरपंच-कांतीलाल गणसिंग सोनावणे विजयी ग्रामपंचायत सदस्य-गौरव गोकुळ पाटील,कविता रघुनाथ भिल,हर्षा गौरव पाटील,राहुल दिनकर पाटील,सोनाली गोविंदा पाटील,प्रतिभा महेंद्रसिंग पाटील.

हे पण वाचा

टीम झुंजार