आडगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या,

Spread the love


आडगाव. तालुका एरंडोल येथील रहिवासी राजेंद्र भगवान पाटील (वय 57) हा दिनांक वीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात गेले, तिथे त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केल्याने त्यांची जीवन यात्रा संपल्याचे समजले. अकरा वाजेच्या दरम्यान शेजारी शेतात गेल्यावर राजेंद्र पाटील हे जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ गावातील त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून कळवले .त्यांना उपचारार्थ एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याबाबत कासोदा पोलीस स्टेशनला सुभाष भगवान पाटील यांनी फिर्याद दिली असून ,अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 32 नुसार फिर्याद नोंदवली असून, त्यांचे शवविच्छेदन बाकी असल्यामुळे, पुढील पंचनाम्याची कार्यवाही बाकी असल्याचे पोलीस स्टेशन वरून समजले .त्याबाबत ए.पी.आय सौ. कायटे मॅडम यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ. युवराज कोळी पुढील तपास करत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सून असा परिवार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार