सूरत : – अपघाताचा एक थरार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पिक-अप व्हॅन ढाब्यामध्ये बसलेल्या काही लोकांना चिरडत जाताना दिसते.
सुरत येथील ढाब्यावर काही लोक आतमध्ये आरामात बसले आणि झोपले होते. तेव्हा अचानक एक पिक-अप व्हॅन आली आणि थेट ढाब्याच्या आत घुसली. यानंतर तिथे हाहाकार माजला. ही संपूर्ण घटना ढाब्याच्या आत आणि बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ :
अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @bhaiyaji25 नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून ही घटना सुरतमधील आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – क्या इस तरह भी दुर्घटना होती है… हा व्हिडिओ आतापर्यंत 90 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यावर अनेक यूजर्सनी निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत आणि आपले असे विचित्र अनुभव सांगितले आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






