कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर
कारंजा (घा):- वर्धा येथे झालेल्या १९ वर्षाआतील जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेत मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा घाडगे येथील चमू विजयी होऊन नागपुर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर निवड झाली आहे.मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजाने पहिला सामना आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय हिंघनघाट तसेच दुसरा सामना जी. एस. कॉमर्स कॉलेज वर्धा यांच्यासोबत जिंकला.
अंतिम सामना मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय आर्वी विरुद्ध मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा घाडगे यांच्यासोबत झाला होता त्यामध्ये मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा घाडगे यांनी विजय संपादन केले.आता विभागीयस्तरावर नागपुर येथे खो – खो संघाची निवड झाली आहे.या संघाचे नेतृत्व कौस्तुभ डोंगरे याने केले तर संघात प्रज्वल भस्मे,सुमित चौधरी,उदय कडवे,दीपक मख,वैभव खवसे, सुमित बारंगे,हर्षल चोपडे,अभिष सूर्जुसे,मयुरी गिरी,सागर येडमे, अमर मडावी यांचा समावेश होता.
या विजयाबद्दल भारत शिक्षण संस्थेच्या सचिव शोभा काळे,संदीप काळे,मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. टोपले, विभागप्रमुख प्राध्यापिका मंजुषा देशमुख,क्रीडा प्रशिक्षक प्रा.मनोज काळे,चंद्रशेखर गिरहाळे यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






