लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत पैकी १५ ग्रामपंचायत वर भाजपचा विजय….

Spread the love

लोणार/उद्धव आटोळे

लोणार :- तालुक्यात ३९ ग्रामपंचायती पैकी १५ ग्रामपंचायतीवर भाजप विजय मिळवला.तालुक्यात महाविकास आघाडीला शह देत शिंदे-भाजपा सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात असून विकास कामांना महत्त्व देत भाजपा विजय मिळत आहे.


लोणार तालुक्यात तालुका अध्यक्ष भगवानराव सानप, शहराध्यक्ष गजानन मापारी, विजय मापारी,प्रकाश महाराज मुंडे,उद्धव आटोळे,अॅड.शिवाजी सानप, अॅड.शिवशंकर आघाव,मारोतराव सुरुशे,शेख जावेद,संजय दहातोंडे,शुभम बनमेरु,गणेश तांगडे,संजय बुरुकुल,संजय दहातोंडे व इतर भारतीय जनता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने भारतीय जनता पार्टी हे लोणार तालुक्यात पक्ष बळकट करण्याचे काम करत आहे.

मेहकर विधानसभा मतदार संघात युतीचा आमदार असुन लोणार तालुक्यात पक्ष वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत असून यानंतरच्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकीला भाजप सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठीची ही सुरुवात आहे.आता झालेल्या निवडणुकीमध्ये ३९ ग्रामपंचायती पैकी १५ ग्रामपंचायत वर भाजपने आपली सत्ता मिळवली असुन जवळपास १२० ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टी कडून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचा पुष्पहार शाल श्रीफळ व पेढे वाटुन जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार