जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील. चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल. सर्व कामांचा ताळमेळ साधावा.
वृषभ :-
आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनात परोपकाराची भावना जपाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. थोरांचा आशीर्वाद मिळेल.
मिथुन :-
मनाची चलबिचलता जाणवेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जुन्या विचारात अडकून पडू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कर्क :-
वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल.
सिंह :-
आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. हित शत्रूपासून सावध राहावे. योग साधनेवर भर द्यावा.
कन्या :-
आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. जुगारातून लाभ संभवतो. मित्रांसोबत फिरायला जाल.
तूळ :-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल.
वृश्चिक :-
सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल.
धनू :-
गोड बोलून कामे करून घ्याल. सर्वांची आपुलकीने चौकशी कराल. मनातील कडवटपणा दूर करता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.
मकर :-
आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल. हातातील कामातून यश येईल.
कुंभ :-
कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा. दूरच्या कामातून लाभ संभवतो. मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.
मीन :-
नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. कामे जलद गतीने पूर्ण होतील. व्यापारी वर्ग खुश असेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






