जालना :- सध्या महाराष्ट्रात प्रेम प्रकरणातून घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच सैराट हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता. सैराट चित्रपटासारखं पळून जाणाऱ्या प्रिक्रयकर आणि प्रियसीला मारण्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. (The father has killed his daughter )
अशातच आता जालनामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप आणि चुलत्याने मुलीला अतिशय भयानक अशी शिक्षा दिली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
दूरच्या नातेवाईकामधील एका तरुणासोबत मृत तरुणीच प्रेमसंबध होत. ती त्या तरुणासोबत घरात कोणालाही काहीही न सांगता तीन दिवस बाहेर राहिली गेली होती. तिच्या वडिलांना ही गोष्ट समजली. मुलीमुळे आपली समाजात बातनामी होणार असं बाप आणि चुलत्याला वाटलं म्हणून त्यांनी तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
झाडाला लटकवून तिला गळफास देऊन मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिची हत्या केली. तरुणाने आत्महत्या केली असं आरोपींना दाखवयाचे होते. त्यासाठी त्यांनी कट रचला. त्यांनी तिच्यावर अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला.
मात्र थोड्याच दिवसात पोलिसांसोमर हा सर्व प्रकार उघडकीस आला. जालना तालुक्यातील पिरपिंपळगावमधील ही धक्कादायक घटना आहे. मदेव भाऊराव सरोदे आणि संतोष भाऊराव सरोदे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






