एरंडोलला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा-दांडी बहाद्दर, बेजबाबदार भ्रष्टाचारी अधिकारींचा केला निषेध

Spread the love


तहसिलदार बजावणार कारणे दाखवा नोटीस- जिल्हाधिकारींकडे अहवाल पाठविण्याची एकमुखी मागणी

एरंडोल – राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम पंचायत समिती हॉल येथे संपन्न झाला. तालुक्यातील प्रमुख कार्यालयांचे अधिकार्‍यांनी (तहसिलदारांनी लेखी कळवून देखील) दांडी मारल्याने उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याने भ्रष्टाचारी, बेजबाबदार अधिकार्‍यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. तहसिलदारांनी गंभीर दखल घेतल्याने दांडी बहाद्दर अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून जिल्हाधिकारींकडे अहवाल पाठविण्यात यावा असेही स्पष्ट करण्यात आले. ग्राहक दिन-ग्राहक मेळाव्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा अ. भा. ग्राहक पंचायत एरंडोल तालूकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव अहिरराव होते तर प्रमुख अतिथी तहसिलदार सुचिता चव्हाण, ग्राहक फाऊंडेशनचे कैलास महाजन, अध्यक्षा आरती ठाकूर, शोभा साळी, प्रा. उज्वला देशपांडे, एरंडोल तालुका संघटक संजय चौधरी उपस्थित होते.

तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी लेखील तक्रारी अथवा समक्ष तक्रारींचे आवाहनानुसार अनेकांनी हजेरी लावली परंतू संबंधित अधिकारीच गैरहजर असल्याने तालूक्यातून आलेले शेतकरी, महिलांनी नाराजी व्यक्त केली. यात कृषी खात्याचे प्रमुख अधिकारी बोरसें बाबत गंभीर तक्रारी करण्यात आल्या. पीक विम्याचे, सानुग्रह अनुदानाचे, पंचनामा होवून मदत न मिळाल्याने तक्रारी करण्यात आल्या. जे उपस्थित होते त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने (सिटीसर्व्हेे, आरोग्य, कृषी) आरोग्य, गॅस एजन्सी, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिकेबाबत गंभीर तक्रारी केल्या. मोफत धान्य, रेशन कार्डबाबत तक्रारी सोडविण्याचे पुरवठा विभाग, तहसिलदार यांनी आश्वासन दिले.

ग्राहक संघटना सदस्या संध्या महाजन यांनी एरंडोल ग्रामीण रूग्णालयाबाबत गंभीर तक्रार केल्याने भोंगळ कारभार, बेजबाबदारपणाच चव्हाट्यावर आणला तर मालती पाटील यांनी दुधातील भेसळ सापडल्यास गय केली जाणार नाही असे स्पष्ट सुनावले. जळगांव-डोंबीवली एसटी बस नेहमीप्रमाणे सुरू करण्याची आणि एरंडोल-जळगांव-विखरण, चोरटक्की, रिंगणगांव, पाळधीमार्गे सुरू करण्याचे आश्वासन आगारप्रमुख विजय पाटील यांनी दिले. तसेच अंजनी धरणातून तीन आवर्तने पाणी सोडण्याचे गिरणा पाटबंधारे विभाग अधिकारी एस. आर. पाटील यांनी सांगितले. लेखी तक्रारींचे वाचन प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी करून संबंधितांना कडक शब्दांत सोडवणूक करण्यास तहसिलदारांमार्फत बजावले. प्रा. उज्वला देशपांडे, संजय चौधरी, शोभा साळी, कैलास महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

कवी निंबा बडगुजर यांनी आगामी कोरोनाबाबत कविता सादर केली. कार्यक़्रमाचे सूत्रसंचलन, प्रास्ताविक हरीष पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसिलदार चव्हाण यांनी मानले. यशस्वतीतेसाठी पुरवठा निरीक्षक संदीप निळे, अव्वल कारकून नंदकिशोर वाघ, विजय मराठे आदींनी परिश्रम घेतल.े
कार्यक़्रमासाठी पत्रकार व्ही. के. महाजन, कुंदन ठाकूर, आल्हाद जोशी, कमरअली सैय्यद, संजय बागड, रघुनाथ कोठावदे, ज्ञानेश्वर बडगुजर, नुरोद्दीन मुल्लाजी, ज्ञानेश्वर बद्गुजर,संजय महाजन, विठ्ठल आधळे, ईश्वर बिऱ्हाड, अनिल बिर्ला,वाल्मीक सोनवणे,यांचेसह महिला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस वंदन करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
नुकत्याच सिक्कीममध्ये अपघातात 16 मृत्युमूखी पडलेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक़्रमाचे उद्घाटक आमदार चिमणराव आबा पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी विनय गोसावी या दोघांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा परंतू तहसिलदारांनी कोणताही खुलासा केला नाही-आश्चर्य व्यक्त.
तक्रार सोडविण्यासाठी अनेकांच्या तक्रारी परंतू अधिकारीच नाहीत त्यामुळे नाराजी-अनुपस्थितीची तहसिलदारांनी घेतली दखल
सकाळी 10 वाजेपासून वीज पुरवठा बंद-1 वाजता देखील बंदच होता.
बेजबाबदार आणि गैरहजर अधिकारींचा प्रथमच निषेध करून सर्वानुमते एकमुखी ठराव केल्यामुळे नागरिक व अधिकारी वर्गात सर्वत्र चर्चा झाली
बँकांबाबत तक्रारी-एकही बँक प्रतिनिधी नसल्याने चर्चा
पीकविमा, सानुग्रह अनुदान, पंचनामा, शासकीय मदत, अतिवृष्टीबाबत अनेक शेतकरी प्रथमच उपस्थित
गावपातळीवर ग्राहक कक्ष स्थापन करण्याची प्रा. शिवाजीराव अहिरराव यांची सूचना
प्रथमच पं. स. हॉल खचाखच भरलेला
चौथा शनिवार असल्याने शासकीय अधिकार्‍यांची मात्र दांडी-महागात पडणार.

टीम झुंजार