Easy Home Remedy For Cough and Cold : अगदी झटपट तयार होणारे हे औषध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयुक्त ठरु शकते.
थंडी वाढली तसा घरोघरी अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. घरात एकाला हे व्हायरल इन्फेक्शन झाले की लगेच सगळ्यांनाच याची लागण होते आणि मग आपण पार हैराण होऊन जातो. सर्दी-कफाने नीट अन्न तर जात नाहीच पण काम करायची ताकदही न राहिल्याने आपल्याला थकवा येऊन जातो. अशावेळी गोळ्या-औषधे घेण्यापेक्षा आजीच्या बटव्यातील काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हे पारंपरिक औषध कसे करायचे हे आपल्याला माहित असेलच असे नाही. स्मार्टवेदा या इन्स्टाग्राम पेजवर मात्र याविषयी सांगण्यात आले असून अगदी झटपट तयार होणारे हे औषध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयुक्त ठरु शकते. पाहूयात हे औषध कसं तयार करायचं
साहित्य –

- १. काळी मिरी – ४ ते ५
- २. लवंग – ४ ते ५
- ३. दालचिनी – १ इंच तुकडा
- ४. मध – ३ ते ४ चमचे
- ५. हळद – पाव चमचा
- ६. काळं मीठ – चिमूटभर
- ७. आलं- अर्धा चमचा
कृती –
- १. मिरी, लवंग आणि दालचिनी चांगली भाजून त्याची पूड करुन घ्यायची.
- २. आलं स्वच्छ धुवून ते बारीक किसून किंवा मिक्सरवर फिरवून घ्यायचे.
- ३. एका बाऊलमध्ये मध घेऊन त्यामध्ये हळद, काळं मीठ, आल्याची कीस घालून सगळे एकजीव करायचे.
- ४. यामध्येच मिरी,लवंग आणि दालचिनीची पावडर घालून सगळे चांगले एकजीव करायचे.
- ५. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ही पेस्ट १ चमचा खायची. त्यामुळे सर्दी आणि कफापासून आराम मिळण्यास मदत होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






