पाचोरा- येथील गिरणाई शिक्षण संस्था तर्फे दिनांक 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 दरम्यान “अमोल भाऊ शिंदे चषक” अंतर्गत विविध विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या भव्य पटांगणावर या स्पर्धा होणार आहेत. अमोल भाऊ शिंदे चषक अंतर्गत गट -अ मध्ये 14 वर्ष आतील मुला- मुलींसाठी बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, त्वायकांदो, टेबल टेनिस व आर्चरी (धनुर्विद्या) च्या स्पर्धा होतील. तर गट -ब मध्ये 17 वर्ष आतील मुला -मुलींसाठी खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, व मॅट वरील कबड्डी व कुस्ती या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
पाचोरा व भडगाव तालुक्यातील शाळांसाठी मर्यादित या स्पर्धा असून स्पर्धेतील सहभागी खेळाडू व संघांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला स्पोर्ट टी-शर्ट व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा होईल. व 2 जानेवारी 2023 रोजी दुपारनंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.
पाचोरा भडगाव तालुक्यातील 2355 शालेय क्रीडापटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी व या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पंडितराव शिंदे , संस्थेचे सचिव ऍड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष नीरजभाई जैन, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






