रिवा : – सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण केली. आरोपीने प्रथम प्रेयसीला जमिनीवर पाडले. त्यानंतर मुलगी बेशुद्ध होईपर्यंत तो तिच्या तोंडावर लाथा मारत राहिला .सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेल्या युवतीचं वय १९ वर्षे आहे.
हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील मौगंज पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. प्रेयसी प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट करत होती, असे सांगितले जात आहे. याचा राग येऊन प्रियकराने आधी प्रेयसीला बेदम चोप दिला. त्यानंतर प्रेयसीचे डोके पकडून जमिनीवर आपटले. यानंतर त्याने तिच्या तोंडावर लाथा मारण्यास सुरुवात केली.
पहा व्हिडिओ :
आरोपीने उडी मारून मुलीच्या तोंडावर लाथ मारली. यादरम्यान मुलगी बेशुद्ध पडली. बराच वेळ मुलगी बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होती. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी डायल 100 पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींविरुद्ध आणखी कलमे लावत गुन्हा नोंद केला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






