सोयगाव दि. २७ (प्रतिनिधी) दिव्यांग सप्ताह निमित्त दि. ६ डिसेंम्बर रोजी क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा व जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्रतीक्षा संजय पवार द्वितीय नम्रता विजय चौधरी तृतीय भाग्यश्री सीताराम गवळी व उत्तेजनार्थ सोनल शामसिंग चव्हाण या विजेत्यांना दि. २७ मंगळवारी गटशिक्षणाधिकारी रंगराव आढाव, शाळेचे मुख्याध्यापक गिरीश जगताप व संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र वही व पेन बक्षीस स्वरूपात देऊन गौरविण्यात आले.
तर स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहन पर पेन वाटप करण्यात आले. या स्पर्धेत ६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रंगराव आढाव, शाळेचे मुख्याध्यापक गिरीश जगताप, संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विष्णू मापारी, सुनील बाऊचे, ज्ञानेश्वर खलसे,संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे,समाजसेवक दत्तू रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षांसह मुख्याध्यापक व संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रशालेचे सुकदेव पाटील, दौलतसिंग परदेशी, शिवाजी नवले, दादाराव राठोड, अनिल ठाकुर, पंकज रगडे, विद्याधर बागुल, श्रीमती वर्षा रामटेके, वैजीनाथ सावळे, सुधाकर उपस्थित होते. शिक्षकवृंद, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलतसिंग परदेशी तर आभार पकंज रगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील शेटे व अरुण जगदाळे यांनी परिश्रम घेतले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






