एरंडोल- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी तथा गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची महिला खेळाडू योगेश्वरी अनिल मराठे हिची कर्जत (जिल्हा अहमदनगर) येथे होणा-या “राष्ट्रीय ऑल इंडिया युनिव्हर्सिटी” महिला कुस्ती स्पर्धेसाठी ६२ किलो वजन गटात निवड झाली.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महिला कुस्ती निवड स्पर्धा दहिवेल (ता.साक्री) येथे संपन्न झाल्या.निवड स्पर्धेत योगेश्वरी अनिल मराठे हिने ६२ किलो गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे तिची कर्जत येथे होणा-या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.योगेश्वरी मराठे हिस गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष तथा कुस्ती कोच भानुदास आरखे,पहेलवान अनिल मराठे,दिलीप पहेलवान यांचे मार्गदर्शन लाभले.
योगेश्वरी मराठे हिने यापूर्वी देखील अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करून पदक प्राप्त केले आहेत.भाजपचे जनजातीय खेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,बालाजी ग्रुपचे संचालक संजय काबरे, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,प्राचार्य एन.ए.पाटील,उपप्राचार्य अरविंद बडगुजर,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,
सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,प्रा.के.जे.वाघ यांनी योगेश्वरी मराठे हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पंकज पाटील,कार्याध्यक्ष दुर्गादास वानखेडे,खजिनदार ऋषिकेश महाजन,अनिल आरखे,नयन आरखे,अनिल भोई,जावेद खाटिक,दिलीप पाटील,संभाजी देसले,अनिल पाटील,डी.एस.पाटील,राजू साळी,संजय कुंबार,नवल धनगर,स्वप्नील बोरसे यांचेसह संस्थेचे सभासद,संचालक उपस्थित होते.






