बिहार: बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. इथे पतीने पत्नीच्या प्रेमकहाणीला पाठिंबा दिलेला आहे. यासाठी त्याने एक अतिशय मनोरंजक पाऊल उचलले आहे. हे प्रकरण नगर पोलिस स्टेशन परिसरातील नया तोळा मोहल्ला मधील आहे. वास्तविक, मखदूमपूर पोलीस स्टेशन परिसरातील कुमडी गावातील रामराज नावाच्या तरुणाने दोन वर्षांपूर्वी सोळंडाच्या रुपा कुमारीसोबत प्रेमविवाह केला होता.
हे दोघेही शहरातील नया तोला मोहल्ल्यात भाड्याच्या घरात राहतात. नवरा मिठाई बनविणारा हलवाई आहे.तो कॉन्ट्रॅक्ट घेऊन मिठाई बनवतो. याच दरम्यान पत्नी रूपाला एका नेटवर्किंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.नोकरी करत असताना पत्नीचं सहा महिन्यांपूर्वी पाटण्यातील विक्रमच्या रणजीत कुमार नावाच्या तरुणाशी प्रेम जडलं. नवऱ्याच्या गैरहजेरीत ती गुपचूप त्याला भेटत असे.जेव्हा जेव्हा पती बाहेर जायचा तेव्हा तेव्हा ती महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची. रविवारी पती बाहेर गेला होता आणि तो आणखी काही दिवस बाहेर राहण्याचा बेत आखत होता,
पण रविवारी अचानक तो आपल्या घरी परतला तेव्हा प्रियकरासोबत आपल्या पत्नीला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. या नंतर पतीने खोली बाहेरून बंद करून पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकारात महिलेच्या पतीने केलं ते खूपच धक्कादायक होतं.
आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत. इकडे पत्नीनंही पोलीसांसमोर कबूल केलं आहे की, तिचं गेल्या सहा महिन्यांपासून रणजीतवर प्रेम आहे आणि त्याचंही तिच्यासोबत नातं आहे.हे ऐकल्यानंतर अखेर पतीने आनंदाने आपल्या पत्नीसमोर तिच्या प्राकारासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिला आपला लेखी पाठिंबा जाहीर केला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






