3 Amazing benefits of khadi sakhar: खडीसाखर आपण क्वचितच कधीतरी खातो. पण ती नियमितपणे खाल्ली तर ॲसिडिटीसह आरोग्याच्या इतर काही तक्रारी निश्चितच कमी होऊ शकतात.
कधी कधी प्रसाद म्हणून खडीसाखर मिळते. तेवढीच काय ती आपण खातो. त्या व्यतिरिक्त नियमितपणे खडीसाखर (rock sugar or khadi sakhar) खाणारे किंवा किराणा दुकानातून दर महिन्याला आवर्जून खडीसाखर आणणारे लोक कमीच असतात. पण खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात, असं डॉ. वरलक्ष्मी यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना सांगितलं. बाजारात दोन प्रकारच्या खडीसाखर मिळतात. यापैकी एका प्रकारच्या खडीसाखरेचा आकार अगदी प्रमाणशीर आणि एकसारखा असतो. तर दुसऱ्या प्रकारची खडीसाखर जरा ओबडधोबड असते. तिचा आकार निश्चित नसतो. ही दुसऱ्या प्रकारची खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम आहे, असंही तज्ज्ञ सांगतात.
खडीसाखर खाण्याचे ३ फायदे :
१. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास
मुखदुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो. दररोज २ वेळा स्वच्छ दात घासूनही तोंडाचा वास जात नाही. अशा लोकांना नियमितपणे खडीसाखर खाणे फायद्याचे ठरते. यासाठी जेवण झाल्यनंतर खडीसाखरेचा एक खडा आणि थोडीशी बडिशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा. ताेंडाची दुर्गंधी कमी होईल.
२. खोकल्यावर गुणकारी :

सतत कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल तर अशावेळीही खडीसाखर चांगली उपयोगी पडते. ज्या लोकांना खास करून रात्री झोपल्यानंतर खोकल्याची उबळ येते, त्यांनी खोकला सुरू झाल्यावर खडीसाखरेचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळावा. काही वेळातच खोकला कमी होईल.
३. ॲसिडिटीसाठी उत्तम :

खडीसाखर ही नॅचरल कुलंट म्हणजेच नैसर्गिक दृष्ट्या एक थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी असा त्रास ज्यांना होतो, त्यांनी खडीसाखरेचे पाणी प्यावे. ॲसिडिटी लगेचच कमी होईल. हा उपाय केल्यामुळे नॉशिया, मळमळ असा त्रासही कमी होतो.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






